
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी (Maratha Andolan) गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर (GR) काढल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. यावर भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हल्लाबोल केला आहे...
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजासाठी (Maratha Reservation) आपला प्राण पणाला लावला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी कधीकाळी दिल्लीत आणि महाराष्ट्रात आंदोलन केले होते.
तेव्हाही हेच गिरीश महाजन मध्यस्थी करायला गेले होते. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आजही भ्रष्टाचार आहे. ते फक्त अण्णांना गुंडाळून आले, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील गुंडाळले जाणारे व्यक्तिमत्व नाही. मनोज जरांगे पाटील हा फकीर माणूस आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. या अत्यंत साध्या माणसाने शिंदे सरकारला जेरीस आणले. ते झुकणार नाहीत, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.