“राजभवनावर चहा-बिस्कीट न घेता...”; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला

“राजभवनावर चहा-बिस्कीट न घेता...”; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला

मुंबई | Mumbai

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं विधान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भागावर केलेल्या दावाने महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच दरम्यान संजय राऊत यांनीही भाजपावर सडकून टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, 'भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सीमाभागात जाऊन कर्नाटक सरकारला कारे करू, असे बोलत आहेत. मात्र, आधी त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांना कारे करावे. राजभवनात जाऊन राज्यापालांची चहा, बिस्कीट न घेता शिवरायांच्या अवमानाबाबत आधी शेलारांनी त्यांना जाब विचारावा. मात्र ते नेभळट आहेत. त्यांच्या मनगटात तेवढी हिंमत नाही. शिवरायांचा इतिहास तुडवला जात असताना, शिवरायांचा अवमान होत असताना ते शांत आहेत. ते काय कर्नाटकात जाऊन कारे करतील.आधी राज्यात शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कारे करा."

सीमावादाच्या मुद्दा तापलेला असल्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द होणार असल्याची चर्चा आहे. यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. 'चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांनी हिंमत दाखवून कर्नाटकच्या सीमेला स्पर्श तरी करुन दाखवावा. ते कर्नाटकवाले महाराष्ट्रात घुसलेत तुम्ही कसल्या आरेला कारे करण्याच्या बाता करता' असं संजय राऊत म्हणाले.

तसेच, 'गुजरात निवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी त्यांचा बराचशा वेळ गुजरातला दिला आहे, पंतप्रधान मोदी हे 3 वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय. तसेच भाजपने कुठल्याही प्रचाराशिवाय गुजरात निवडणूक जिंकायला हवी असे राऊत म्हणाले. तसेच लोकं असे म्हणतात, निवडणूक यंत्रणेवर आमचा विश्वास नाही, म्हणजेच सरकारच्या विरुद्ध लोकांची भावना असली तरी भाजपचे उमेदवार जिंकतील असं होणार नाही. मशीन गडबड करून किती गडबड करणार, वेट अॅंड वॉचची भूमिका घेणे योग्य आहे.'

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com