Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकेसरकरांच्या 'त्या' विधानानंतर संजय राऊतांची CM शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले, “मानसिक स्वास्थ...

केसरकरांच्या ‘त्या’ विधानानंतर संजय राऊतांची CM शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले, “मानसिक स्वास्थ बिघडलेल्या व्यक्तीच्या…”

मुंबई | Mumbai

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा केला. त्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. यावर बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, ज्या व्यक्तीच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येत असेल, तर ती व्यक्ती मानसिक स्वास्थ बिघडलेली. अशा व्यक्तीच्या हातात राज्य देणे कितपत योग्य, ती व्यक्ती राज्य कसे चालवणार असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच एका राज्याचा प्रमुख ज्याच्या हातात संपूर्ण राज्याची धूरा आहे. त्या व्यक्तीबद्दलची अशी गोपनिय माहिती केसरकरांनी इतक्या दिवस का लपवून ठेवली? खरं तर गोपनिय माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांच्यावर सर्वात आधी चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; म्हणाले, “येत्या १ जुलै रोजी…!”

दीपक केसरकर काय म्हणाले होते?

अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता. वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती. एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदेंनी म्हटलं, ‘मला जेव्हा वाटलं उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा एकच गोष्ट केली असती. माझ्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं. मी एक फोन केला असता, माझी चूक झाली आहे. यांची काही चूक नाही. तिथेच माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं शिंदेंनी सांगितल्याचं दीपक केसरकर म्हणाले.

Odisha Train Accident : ओडिसा रेल्वे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट? सिग्नल अभियंता कुटुंबासह फरार

- Advertisment -

ताज्या बातम्या