Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याहक्कभंगाची मागणी होताच संजय राऊत म्हणाले, “मी तुरुंग गेलेला माणूस आहे, त्यामुळे...”

हक्कभंगाची मागणी होताच संजय राऊत म्हणाले, “मी तुरुंग गेलेला माणूस आहे, त्यामुळे…”

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानं त्यांच्या वक्तव्याचे पडसाद सभागृहात उमटले. संजय राऊतांच्या वक्तव्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. यासंबधी हक्कभांगाचा निर्णय ८ मार्चला देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. यावर आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

आज विधिमंडळात माझ्याविरोधात गदारोळ झाला, असं मला कळलं. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी कोणत्या संदर्भाने बोललो याचा सारासार विचार करायला हवा. माझ्यावर हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार सदस्यांना असू शकतो. जर सभागृहाने माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर मी त्याला निर्भीडपणे सामोरे जाईन. मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, हक्कभंगाला घाबरतो की काय… अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं.

Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…

गेल्या २० वर्षांपासून मी स्वत: देशातल्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे. विधिमंडळ असो की संसद या दोन्ही कायदेमंडळाचा मी कायम आदर केलाय. राज्यसभेच्या कामकाजात सर्वाधिक काळ सहभागी होणारा मी सदस्य आहे. शिवेसनेने संसदीय लोकशाहीवर कायम विश्वास ठेवला आहे. आज जो काही माझ्याविरोधात गदारोळ झाला, असं मला कळलं. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी कोणत्या संदर्भाने याचा सारासार विचार करायला हवा. माझ्यावर हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार सदस्यांना असू शकतो. त्यावर चर्चाही होईल, त्यावर मी उत्तर देईल. मी कोणत्या भावनेने बोललो, हे आधी समजून घेतले पाहिजे. एकांगी कारवाई करता कामा नये, असं राऊत म्हणाले.

लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार! मार्चमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी

तसेच, माझी ही भूमिका त्यांच्या विरोधात होती, ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न चोरण्याचा प्रयत्न केला. मुळात हा विषय त्यांच्या पुरता मर्यादीत आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी त्यांच्या विषयी ते विधान केलं होते. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवलं, ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली. त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत, असेही ते म्हणाले. तसंच महागाई, बेरोजगारी, वीजेचा प्रश्न, कायदा सुव्यवस्था आणि खोक्याच्या राजकारणापासून लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी मला टार्गेट करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.

“शंभर बापाची औलाद नसशील, तर…”; मोहित कंबोज यांना भास्कर जाधवांच खुलं आव्हान

- Advertisment -

ताज्या बातम्या