संजय राऊतांच्या जामीनावर रोहित पवारांनी ट्विट केलेला 'तो' VIDEO चर्चेत

संजय राऊतांच्या जामीनावर रोहित पवारांनी ट्विट केलेला 'तो' VIDEO चर्चेत

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना तब्बल १०० दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. ED ने कोर्टाविरोधात केलेलं अपीलही फेटाळण्यात आल्यामुळे संजय राऊत यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्वीट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वाघ बाहेर येत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला सत्यमेव जयते! असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या रुपाने वाघ पुन्हा एकदा पिंजऱ्याबाहेर आला असल्याचं पवार यांनी सुचित केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com