Saturday, April 27, 2024
Homeराजकीयसंगमनेर : सकल मराठा समाजाचे महसूल मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

संगमनेर : सकल मराठा समाजाचे महसूल मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महात्मा गांधी जयंती निमित्ताने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले. संगमनेरात आज सकाळी 11 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाने जोरदार आंदोलन करत मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली.

- Advertisement -

राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्यास आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीचा मार्ग सुकर होऊ शकेल, सरकारने विशेष अधिवेशन बोलावून तातडीने अध्यादेश काढावा, नवीन सरकारी नोकर भरती तात्काळ थांबवावी आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासनाने जर मराठा समाजाच्या वरील मागण्यांचा विचार न केल्यास भविष्यात समाजाला आक्रमक भूमीका घ्यावी लागेल. त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशाराही सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांचे निवेदन नायब तहसिलदार सुभाष कदम यांनी स्वीकारले.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अमोल खताळ, खंडु सातपुते, अमोल कवडे, राजेंद्र देशमुख, शरद नाना थोरात, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, निर्मलाताई गुंजाळ, अर्चना बालोडे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, चंद्रकांत कडलग, अशोक सातपुते, तात्या कुटे आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या