काँग्रेसच्या मागणीला यश आल्याचा सनेर यांचा दावा

सिलेंडरच्या पुरवठ्यासह गतीमानतेवर भर
काँग्रेसच्या मागणीला यश आल्याचा सनेर यांचा दावा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिंदखेडा रुग्णालयास जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करुन रुग्णालय गतीमान करण्यावर भर दिला आहे.

आज उपविभागीय अधिकारी विक्रांत बांदल यांनी भेट देवून पाहणी केली.

यावेळी तहसीलदार सुनील सैंदाणे, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत देशमुख, मुख्याधिकारी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक आहिरे, नगरसेवक उदय देसले, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील उपस्थित होते.

काँग्रेसच्या वतीने याबाबत सातत्याने मागणी होत होती. त्यास यश आल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. सनेर यांनी केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com