Friday, April 26, 2024
Homeराजकीय..असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल, रोहित पवारांचं सूचक ट्विट

..असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल, रोहित पवारांचं सूचक ट्विट

मुंबई l Mumbai

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला असून अमेरिकेत आता सत्तांतर झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. जगभरातून या विजयाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी ज्यो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. दरम्यान त्यांनी बायडन याना शुभेच्छा देतांना नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकांच्या निकालासंबंधात देखील सूचक वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

“अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे.” असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

..यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा

दरम्यान बहुतांश एक्सिट पोलवरून बिहारमध्ये सत्तांतर होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर पवार यांनी म्हटलं आहे की, ‘बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा.’ असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या