पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ

पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली. त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी (ED Custody) कोर्टाने सुनावली आहे. संजय राऊत यांच्या अटकेवरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर टीका केली आहे...

ते म्हणाले की, पत्राचाळ गैरव्यवहार (Patra Chawl Scam) प्रकरणात संजय राऊतांचा (Sanjay Raut) सहभाग आहे, मात्र तरीही विरोधक भ्रष्टाचाराचे राजकारण करत असल्याचे संपूर्ण देश पाहत आहे. राऊत हे एका पक्षाचे नेते आहेत म्हणून ईडीने तपास न करता प्रकरण बंद करण्याची गरज आहे का?, अशी टीका त्यांनी केली आहे.

पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ
कांदा रडवणार! शेतकऱ्यांकडून कांदा विक्री बंदचा इशारा

विरोधक भ्रष्टाचार प्रकरणावर विनाकारण गोंधळ घालत आहे. संजय राऊत यांची न्यायालयाने (Court) कोठडीत रवानगी केली असून त्यांच्याविरोधात कागदपत्रे आहेत. हे राजकीय पक्षातले आहेत की कुठल्यातरी मोठ्या घराण्यातील आहेत म्हणून त्यांना वाचवायचे प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल पात्रा यांनी केला आहे.

पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ
९ ऑगस्टपासून राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव

प्रवीण राऊत हे डिरेक्टर आहे, त्यांनी करार पाळला नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी 9 खाजगी बिल्डरांना बोलावून जमीन 901 कोटींना विकली. त्यांनी एकूण 1040 कोटी जमा केले. त्याची चौकशी व्हायला नको का? असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com