छत्रपती संभाजीराजेंची नवी मोहीम, ९ ऑगस्टला तुळजापूरमध्ये मोठी घोषणा करणार?

छत्रपती संभाजीराजेंची नवी मोहीम, ९ ऑगस्टला तुळजापूरमध्ये मोठी घोषणा करणार?

मुंबई | Mumbai

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी परिवर्तन क्रांतीची घोषणा केली आहे. येत्या ९ ऑगस्टपासून तुळजापूर (Tuljapur) येथून परिवर्तन क्रांतीची सुरूवात होईल. अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

आज सकाळी संभाजीराजेंनी याबाबतंच आज (बुधवार) सकाळी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात. भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला.'

दरम्यान ९ ऑगस्ट रोजी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्याकडून एखादी मोठी घोषणा होऊ शकते. त्यामुळे आता ठाकरे, शिंदे आणि भाजप यांच्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा दावेदार उभा राहण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली होती. पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होत.

यासोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असंही संभाजीराजे म्हणाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com