कोश्यारींना सुरक्षा, आंदोलकांना अटक, हा कोणता न्याय?; संभाजीराजेंचा संतप्त सवाल

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Kashayri) यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात स्वराज्य संघटनेने काळे झेंडे दाखवून कोश्यारींचा निषेध केला. याप्रकरणी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पोलिसांच्या या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करतानाचा व्हिडीओ ट्विट केलाय. ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हंटले आहे, राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ? “स्वराज्य”चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले..म्हणून स्वराज्य च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत ? आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे ? अशा आशयाचे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *