आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक; म्हणाले, “…याचे परिणाम भोगावे लागतील”

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) नी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर आव्हाडांविरोधात अनेक आंदोलन करण्यात आली आहे.

भाजपानेही आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असं आव्हाडांकडू सांगण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत आता माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”; थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतानाच जितेंद्र आव्हाडांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

सुप्यात कोयता गँगची दहशत; एकावर कोयत्याचे वार

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाल होते?

महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान केलं होते. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितलं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे.”, असं ते म्हणाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *