
मुंबई । Mumbai
राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय वैयक्तिक होता. याबाबत त्यांनी कुटुंबियांशी सल्लामसलत केली नव्हती, त्यामुळं....
शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारण हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही, असं विधान संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी केलं आहे. त्यानंतर वडिलांची प्रतिक्रिया आल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यावर सूचक शब्दांत ट्वीट केलं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही”, असं संभाजीराजे छत्रपती आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.