'...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारला संभाजीराजेंचा इशारा

'...तर उठाव होणारच'; शिंदे-फडणवीस सरकारला संभाजीराजेंचा इशारा

मुंबई | Mumbai

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत.

भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?, असा संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवताना संभाजीराजेंची भावना ही महाराष्ट्राची भावना असल्याचं म्हटलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारींना हटविण्यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे.

शिवाजीराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यावं हीच भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने वादग्रस्त बोलणाऱ्यांविरोधात, त्यांना कमी लेखणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील जनतेने एकत्र यावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com