शिवसेना भवनासमोर समर्थकांची बॅनरबाजी; संभाजीराजे म्हणाले, “हे माझ्या तत्त्वात...”

शिवसेना भवनासमोर समर्थकांची बॅनरबाजी; संभाजीराजे म्हणाले, “हे माझ्या तत्त्वात...”

मुंबई | Mumbai

राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. तर भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले.

दरम्यान हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला असतानाच आता संभाजीराजे समर्थकांनी सेनेला चांगलेच डिवचलं आहे. संभाजीराजे यांच्या समर्थकांनी थेट शिवसेना भवनासमोरच बॅनरबाजी केली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी माझ्या प्रेमापोटी हे फ्लेक्स लावले आहेत. त्याच्या प्रेमाचा मी आदर करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही. मी राजकारणात येणार असलो तरी 'स्वराज्य' ला तत्त्वांची बैठक असेल, अशी प्रतिक्रिया देणारे द्विट संभाजीराजेंनी केलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com