शरद पवारांचे नाव आगलावे ठेवा; सदाभाऊ खोतांचा बाण

शरद पवारांचे नाव आगलावे ठेवा; सदाभाऊ खोतांचा  बाण

सोलापूर | Solapur

शरद पवार (Sharad Pawar) केवळ महाराष्ट्रात (Maharashtra) काड्या करतात. त्यांचे उभे आयुष्य आग लावण्यातच गेले आहे. त्यामुळे शरद पवार यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे, अशी खोचक टीका रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे...

एका खासगी कार्यक्रमासाठी सदाभाऊ खोत हे सोलापूरमध्ये (Solapur) आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवारांचे नाव आगलावे ठेवा; सदाभाऊ खोतांचा  बाण
Visual Story : काश्मिरी पंडितांचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे विचार कसे होते?

ते म्हणाले की, शरद पवार हे खूप महान नेते आहेत. पण त्यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) काड्या करण्याखेरीज काहीही केलेले नाही. एका घरात आग लावायची तिथले झाले की दुसऱ्या घरात आग लावण्याचे काम शरद पवार करतात, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहे.

तसेच त्यांनी यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या डायरी प्रकरणाचादेखील उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, आईला काही उपहार दिला असेल तर आम्ही ते डायरीमध्ये लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात. आईला काही दिले तर कुणीच ते लिहून ठेवत नाही. मात्र आई जर वसूलदार असेल तर लिहून ठेवले जाते. नामकरण झालेल्या मातोश्रींवर उपकार केलेले लिहून ठेवले जाते अशीदेखील टीका खोत यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com