ठरलं! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल विरुद्ध कमळ लढत

ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल यांच्यात 'सामना'
ठरलं! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल विरुद्ध कमळ लढत

मुंबई | Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयाने महापालिकेला राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे...

शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) ही निवडणूक लढणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी आज अर्ज भरण्यासाठी चाललो आहे. अंधेरी आमचा एक परिवार आहे, येथे सर्वधर्मीय लोक राहतात. अंधेरीची जनता आम्हाला पूर्ण बहुमताने निवडून देईल, असा विश्वास मुरजी पटेल यांनी व्यक्त केला आहे.

ठरलं! अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल विरुद्ध कमळ लढत
सुरगाणा : नाशिकचे 'काश्मीर', पाहा फोटो...

मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. पक्षाने मला निवडणूक लढवण्यास सांगितल्याने मी मैदानात उतरलो आहे. आमच्याबरोबर खऱी शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत. रामदास आठवले यांचा आरपीआय गटही आमच्यासोबत आहे. महायुती म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com