कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच 'मराठी'चा विसर पडलाय; रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच 'मराठी'चा विसर पडलाय; रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

मुंबई | Mumbai

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु झाले असून शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena Symbol) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे...

त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. तर आगामी निवडणुकीसाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारसाठी (Shinde-Fadnavis Government) अत्यंत महत्वाचे मानले जात असून अधिवेशनाची सुरुवात महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपाल रमेश बैस यांनी अधिवेशनाच्या आधी हिंदीतून अभिभाषण केले. मात्र, त्यांच्या या अभिभाषणावरून सरकारवर आणि नवनियुक्त राज्यपालांवर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका केलीय. “दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच मराठीचा विसर पडलाय” असं रोहित पवार यांनी म्हटलंय.

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट शेअर केलंय. “आज #मराठीभाषागौरवदिन असताना राज्यपाल महोदयांनी अभिभाषण मराठीत केलं असतं किंवा भाषणाची सुरवात जरी मराठीत केली असती तरी मराठी मनाला आनंद झाला असता. पण यात राज्यपालांचीही चूक नाही. अभिभाषण तर राज्य सरकार तयार करत असतं! कदाचित दिल्लीच्या प्रभावाने सरकारलाच मराठीचा विसर पडलाय!” असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.

राज्यपालांच्या अभिभाषणातून जनतेची दिशाभूल - आदित्य ठाकरे

अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणातील अनेक मुद्दे हे महाविकास आघाडीने सुरू केलेल्या कामांबाबत होते. आज सत्ताधारी पक्षाचा उत्साह कमी जाणवत होता. अभिभाषणात राज्यपालांनी दिशाभूल केलीय का असा प्रश्न होतो. दावोसबाबत त्यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे सभागृहातील पटलावर सत्य बाजू येण्याचा आम्ही अधिवेशातून प्रयत्न करणार आहोत.

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होते, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “गद्दारी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी गेल्या सहा महिन्यांत १२ कारणे दिली आहेत. पण गद्दार हे गद्दारच असतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com