“भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, आपल्या दैवतांवर...”; रोहित पवारांचा हल्लाबोल

“भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, आपल्या दैवतांवर...”; रोहित पवारांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

'वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,' या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले.

या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत भाजपवर कडक शब्दात टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे, "छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय.

सुधांशू त्रिवेदींच्या या विधानावरून आमदार जितेंद्र आव्हाडांनीही ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय. "शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं म्हणणारा ठार वेडाच असू शकतो… बोलणारा भाजप प्रवक्ता", असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com