Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याRohit Pawar : 'बारामती अ‍ॅग्रो'बाबत रोहित पवारांना हायकोर्टाचा दिलासा! विरोधकांना थेट इशारा...

Rohit Pawar : ‘बारामती अ‍ॅग्रो’बाबत रोहित पवारांना हायकोर्टाचा दिलासा! विरोधकांना थेट इशारा देत म्हणाले..

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं बारामती अ‍ॅग्रोचे प्लांट बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. रोहित पवार यांनी मुंबई हायकोर्टाचे आभार देखील मानले आहेत.

- Advertisement -

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बारामती अ‍ॅग्रो कंपनीचे दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. या नोटिशीचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले होते. आपल्याविरोधात सूडाची कारवाई सुरू असून दोन मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर कारवाई झाली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता.

रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘बारामती ॲग्रॉ’ च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मा. हाय कोर्टाचे आभार मानतो… तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं आहे, ते करणाऱ्यांनी करत रहावं.. त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल… पण यानिमित्ताने माझं त्यांना एक सांगणं आहे की, महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय… एका अर्थाने राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही आहात, पण लोकशाहीत सामान्य जनता ही बाप असते, हे विसरू नका. त्यामुळं आज जरी तुम्ही खुशीत असलात तरी भविष्यात हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही.. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते’

Gautami Patil : गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे कारण?

दरम्यान, बारामतीमधील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने रोहित पवार यांना नोटीस दिली असून 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना दिली आहे. याविरोधात रोहित पवारांनी हायकोर्टात धाव घेतली असून दिलासा मिळाला आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला आदेश दिले आहेत. याबाबत सहा ऑक्टोबरला पुढील सुनावणी पार पडणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याकडून सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराची पोलखोल; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, “चित्रपटासाठी ६.५ लाख…”,

- Advertisment -

ताज्या बातम्या