औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठीच का?; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठीच का?; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वप्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. मात्र याची माहिती देतांना त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद केल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नामांतराचा विषय तुम्ही सुद्धा केवळ राजकारणासाठी वापरता का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल आहे, 'मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय... आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय.. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा!'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्वीट

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या कामकाजाच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दुर करून वक्फ मालत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने https://mahawaqf.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल विकसित केले आहे. आता ऑनलाईन नोंदणीची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com