Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याRohit Pawar : भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरच्या चर्चेनंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना केले 'हे'...

Rohit Pawar : भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरच्या चर्चेनंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…

मुंबई | Mumbai

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी होऊन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात अनेक वरिष्ठ नेत्यांसह आमदारांचा (MLA) मोठा गट भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या सत्तेतील सहभागानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार असल्याने अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

Maharashtra Rain Update : राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता या रांगेत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचा देखील समावेश झाला असून कार्यकर्त्यांकडून रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील (Pune-Mumbai Expressway) उर्से टोल नाका येथे झळकला आहे. त्यामुळे यासंदर्भात राजकीय वर्तुळात निगेटिव्ह चर्चा सुरू झाली असून याबाबत आता आमदार रोहित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे.

Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आमदार रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स न लावण्याचे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या वाढदिवसानिमित्त (२९ सप्टेंबर) माझ्यावर आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते वेगवेगळे बॅनर लावत आहेत. पण, असे बॅनर न लावता त्यावर होणाऱ्या खर्चातून आपण शालेय विद्यार्थी आणि चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांना आवश्यक वस्तू द्याव्यात. शेवटी आपण इथे कोणत्या पदासाठी नव्हे तर विचारधारेच्या लढाईसाठी काम करत आहोत. पदे येतात आणि जातात. पण विचारधारेचे तसे नाही, ती एकदा सोडली तर कोणत्याही पदाला किंमत राहत नाही. हाच विचार कार्यकर्त्यांनीही पुढे न्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Ajit Pawar : “माझं ते काम…”; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, या बॅनरबाजीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी “असे बॅनर लावून काहीही उपयोग नाही. यापासून केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते. तसेच मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर १४५ चा आकडा गाठावा लागतो. नाही तर मुख्यमंत्री व्हायचे हे केवळ दिवा स्वप्नच राहते”, असे म्हणत रोहित पवारांना टोला लगावला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘भावी मुख्यमंत्र्यां’च्या यादीत वाढ! अजित पवार, सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही बॅनर झळकले

- Advertisment -

ताज्या बातम्या