काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीचा घेतला आढावा

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी केली चर्चा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीचा घेतला आढावा

मुंबई । प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून राज्यातील करोनाची परिस्थिती आणि सरकारकडून होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेचे वेळेत लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना सोनिया गांधी यांनी केल्याची माहिती थोरात यांनी दिली.

राज्यातील कोरोना परिस्थितीत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कामाबाबत सोनिया गांधी यांनी समाधान व्यक्त केले. राज्य सरकार पारदर्शकपणे करोना परिस्थिती हाताळत असून सरकारने यापुढेही अधिक काळजी घ्यावी, अशी सूचना सोनिया गांधी यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com