माझ्या चौकशीमागे महाविकास आघाडीची सूडभावना

- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप
माझ्या चौकशीमागे महाविकास आघाडीची सूडभावना

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अर्ध्या अर्ध्या तासांची त्रोटक माहिती घ्यायची असते. परंतु पुन्हा पुन्हा बोलवायचे आणि चार-चार तास बसवून ठेवायचे अशी पोलिसांची सरकारच्या दबावाखाली चौकशी सुरू आहे. तेच तेच मुद्दे विचारून चौकशी करण्याचा प्रयत्न होता. छळवाद मांडायचा आणि महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aaghadi ) नेत्यांवर ज्या कारवाया होत आहेत त्या क्रियेला प्रतिक्रिया द्यायची, अशा प्रकारची सूडभावनाच या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar )यांनी सोमवारी केला.

दरेकर यांची आज दुसऱ्यांदा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात चौकशी ( Inquiry )करण्यात आली. दुपारी १२च्या सुमारास ते पोलिस ठाण्यात उपस्थित राहिले. सुमारे अडीच तास दरेकर यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी आज केलेल्या चौकशीत एफआयआर संबंधित काहीही माहिती विचारली नाही. केवळ व्यक्तीगत चौकशी करण्यात आली. व्यक्तिकेंद्रित छळवाद मांडण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली असलेली पोलिसांची मानसिकता आजच्या चौकशीत दिसली.

आम्ही लोकशाही मानणारे भाजपचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रस्ताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते आपण पाहिले आहे. त्यांच्या नेत्यांवर ज्या कारवाई होतात. त्याला प्रतिक्रिया म्हणून आमच्यावर दबाव आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे. जी माहिती अर्ध्या तासात देऊ शकतो त्यासाठी पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावून तासनतास बसवून ठेवत आहेत. हा सूडाच्या भावनेतून छळवाद सुरू आहे. मात्र आम्ही कायद्याला प्रतिसाद देण्यास तयार आहोत. ज्या ज्या वेळी पोलिसांना सहकार्य लागेल तेव्हा सहकार्य करू, असे दरेकर म्हणाले.

Related Stories

No stories found.