Friday, April 26, 2024
Homeराजकीयलसीकरणाच्या शंकांचे निरसन करा

लसीकरणाच्या शंकांचे निरसन करा

मुंबई /प्रतिनिधी
येत्या १ मेपासून १८ वर्षांपुढील वयोगटासाठी सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली.

लसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे. १ मे नंतर लसीकरणासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. सध्याचे लसीकरण आणि १ मेपासून होणारे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाहता प्रत्येक महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यानुसार लसीकरण केंद्रांची आकडेवारी जाहीर करावी. लसीकरणासाठी होणारी अधिकची गर्दी ध्यानात घेऊन सरकारने लसीकरणासाठीची जी जास्तीची केंद्रे निश्चित केली आहेत त्यांची यादी जाहीर करावी, असे उपाध्ये म्हणाले.

- Advertisement -

१ मेनंतर होणाऱ्या लसीकरणासाठी आयत्या वेळी येणाऱ्या नागरिकांना वॉक इनसाठी परवानगी असेल का ? की केवळ आधी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण केले जाईल याबद्दल तसेच लसीकरण मोफत आहे की सशुल्क याचा खुलासा सरकारने करावा, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या