Friday, April 26, 2024
Homeराजकीयस्विकृत नगरसेवक अमर जैन यांच्या राजीनाम्याची चर्चा

स्विकृत नगरसेवक अमर जैन यांच्या राजीनाम्याची चर्चा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक अमर जैन हे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा होती.

- Advertisement -

त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे आपली वर्णी लागावी यासाठी जवळपास दहा ते बारा इच्छूकांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता, शिवसेना नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे 57 नगरसेवक, शिवसेनेचे 15 तर एमआयएमचे तीन नगरसेवक निवडून आले आहे.

पक्षीय बलाबलनुसार शिवसेनेच्या वाट्याला एक स्विकृत नगरसेवक पद आले. त्यामुळे शिवसेनेने अमर जैन यांना संधी दिली आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या महापालिकेतील सत्तांतरात भाजपचे 27 नगरसेवक फूटून शिवसेनेनेसोबत आले. त्यामुळे अडीच वर्षातच भाजपची सत्ता संपुष्ठात येवून शिवसेनेच्या हातात आली.

दरम्यान, स्विकृत नगरसेवक अमर जैन हे आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येताच महापालिकेसह राजकीय गोटात चांगलीच चर्चा रंगली. अमर जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आपल्याला संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे दहा ते बारा जण इच्छूक असल्याचे बोलले जात आहे.

तसेच काही इच्छूकांनी आपआपल्या परीने शिवसेनेच्या नेत्यांकडे मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यावी, या कारणावरुन आता, नेत्यांचीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

राजीनामा देण्याच्या चर्चेमुळे नगरसेवक अमर जैन यांच्याशी संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही. मात्र अमर जैन हे आपल्या स्विकृत नगरसेवक पदाचा राजीनामा सोमवारी राजीनामा देणार असल्याचे संकेत एका ज्येष्ठ नगरसेवकांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या