Saturday, April 27, 2024
Homeराजकीयमोटेरा स्टेडियमला मोदींचं नाव दिल्याने हार्दिक पटेल आक्रमक, म्हणाले..

मोटेरा स्टेडियमला मोदींचं नाव दिल्याने हार्दिक पटेल आक्रमक, म्हणाले..

दिल्ली l Delhi

जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लड ४ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी मोटेरा स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन केले. उद्घाटनासह, मोटेरा स्टेडियमचे नाव बदलण्यात आलं असून आता नरेंद्र मोदी असं नामकरण करण्यात आलं आहे. आता या नामांतरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केलीय. गुजरातमधील पाटीदार समाजाचे आणि काँग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपा सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केल आहे .

‘द सरदार पटेल क्रिकेट स्टेडीयन हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होते. या स्टेडियमचे आता नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का?, असा सवाल हार्दीक पटेल यांनी केला आहे. ‘भाजप सरदार पटेल यांच्या नावावर मत मागत होती आणि आता त्याच सरदार साहेबांचा अपमान करत आहेत. गुजरातमधील जनता सरदार पटेलांचा हा अपमान सहन करणार नाही’, असे हार्दीक पटेल यांनी ट्विट केले आहे.

तसेच, ‘भारतरत्न आणि लोहपुरुष सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. त्यामुळे आरएसएसचे चेले सरदार पटेल यांचं नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बोलताना आदर आणि मनात कटुता असं वर्तन भाजपचं सरदार पटेल यांच्याविषयी आहे. मात्र सरदार पटेल यांचा अपमान सहन केला जाणार नाही,’ असंही हार्दिक पटेल यांनी म्हटलं.

‘मोटेरा स्टेडियम’ जगातील सर्वांत क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता १,१०,१०० आहे आणि हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आणि जगातील दुसरे मोठे स्टेडियम आहे. उत्तर कोरियाच्या प्योंगयांग मधील Rungrado May Day मध्ये बसण्याची क्षमता १,१४,००० इतकी आहे. हे नवीन मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. या स्टेडियममध्ये ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे. तसेच या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्टेडियम बनवणाऱ्या कंपनीने (L&T) असा दावा केला आहे की स्टेडियममध्ये अशा एलईडी दिवे लावण्यात आले आहेत की ज्यामुळी खेळाडूंची सावलीही कमी पडेल. त्याचबरोबर या स्टेडियमची पार्किंग सुविधाही चांगली असून. एकावेळी येथे ३००० कार आणि १० हजार दुचाकी वहाने पार्क केली जाऊ शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या