Thursday, April 25, 2024
Homeराजकीयबॉम्बे नाही 'मुंबई'च!; बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नाव बदला, मनसेची मागणी

बॉम्बे नाही ‘मुंबई’च!; बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नाव बदला, मनसेची मागणी

मुंबई l Mumbai

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नेहमीच मराठीसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील शेअर मार्केटचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. देशातील अर्थव्यवस्थेत आणि कॉर्पोरेट क्षेत्रात बीएसई (BSE) म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंजचं मोठं योगदान आहे.

- Advertisement -

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावं अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया चे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव “मुंबई स्टॉक एक्सचेंज” च असले पाहिजे.”

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुमारे २ महिन्यांपूर्वी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांना त्यांच्या ॲपमध्ये मराठी भाषा वापरण्याचा इशारा दिला होता. एमेझॉन व्यवस्थापनाने अजूनही मराठी भाषेच्या वापराबाबत कोणतेही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी दुकानांच्या नावांच्या पाट्या या मराठी भाषेतच असाव्यात यासाठी खळ्ळ-खट्याक आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला यश मिळालं. मोठमोठ्या ब्रॅण्ड्स सह इतर दुकानांवर देखील मराठी भाषेतील नावाचा उल्लेख यामुळे करण्यास सुरुवात झाली होती. आता, मनसेने मुंबईतील रोखे बाजाराकडे आपला मोर्चा वळवला आहे.

९ जुलै १८७५ म्हणजेच तब्बल १४५ वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणारं हे मार्केट आहे. देशातील कार्पोरेट क्षेत्राला वृद्धी प्राप्त करुन देण्यात आणि आर्थिक विकास साधण्याचं हे मोठं मार्केट आहे. विशेषत: BSE या नावाने हे शेअर मार्केट ओळखले जाते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियाचे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. बीएसईच्या माध्यमातून जगभरातील विविध क्षेत्रांतील कंपन्यांशी मुंबईचं नात जोडलं आहे, तसेच कोट्यवधीची आर्थिक उलाढाल या माध्यमातून होत आहे. मात्र, मनसेकडून हा भावनिकतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून बॉम्बेऐवजी मुंबई नाव करण्याची मागणी मनसेनं केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या