Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयपेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करा- काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान

पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करा- काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल Petrol, डिझेल Diesel, गॅसचे LPG दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पंजाब आणि राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान Congress state president Naseem Khan यांनी मुख्यमंत्र्यांकडे Chief Minister Thackeray केली आहे.

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल, बुधवारी पत्रकार परिषदेत पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ नसीम खान यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पक्षाची मागणी पुढे रेटली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच इंधनावरील कर कपातीची मागणी फेटाळून लावली आहे.

केंद्र सरकारने मागील सात वर्षात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. कोरोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे, असे खान यांनी पत्रात म्हटले आहे.

पेट्रोल डिझेलवरील कररुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही. त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही, तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे. परंतु जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या