खडसेंची पहिली प्रतिक्रिया, अपात्रतेच्या भीतीपोटी ‘त्या’ नगरसेवकांचे पक्षांतर

खडसेंची पहिली प्रतिक्रिया, अपात्रतेच्या भीतीपोटी ‘त्या’ नगरसेवकांचे पक्षांतर

मुक्ताईनगर । वार्ताहर Muktainagar

मुक्ताईनगर नगरपंचायत भाजपाच्या 13 आणि 1 अपक्ष अशी 14 संख्या आहे. यापैकी शिवसेनेत 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची वृत्त आहे. परंतु आज केवळ भाजपाचे चार व एक अपक्ष असे पाच नगरसेवक शिवसेनेकडे गेल्याचे दिसून येत आहे.

खडसेंची पहिली प्रतिक्रिया, अपात्रतेच्या भीतीपोटी ‘त्या’ नगरसेवकांचे पक्षांतर
जळगावनंतर मुक्ताईनगरात भाजपला धक्का : ६ नगरसेवक शिवसेनेत

त्यापैकी भाजपाची एक नगरसेविका ही चार अपत्ये असल्याच्या कारणाने अपात्र झाली आहे तर उर्वरित त्या तीन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याच्या भीतीपोटी तसेच त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई होऊ देणार नाही, अशी खात्री संबंधितांनी दिली असल्यामुळेच त्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी विविध एका अंतर्गतसुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे. भाजपच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ही दिशाभूल असल्याच माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे फार्म हाऊसवर पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

मुक्ताईनगर येथील भाजपाच्या काही नगरसेवकांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकनाथराव खडसे यांनी खडसे फार्महाऊसवर संध्याकाळी तात्काळ पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की, मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये 13 भाजपचे व एक अपक्ष असे एकूण 14 नगरसेवक आहेत. त्यापैकी 10 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त खोटे व दिशाभूल करणारे आहे. आपल्यासोबत 9 नगरसेवक आता हजर असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणारे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी चार नगरसेवक हे भाजपाचे असून त्यापैकी एक अपक्ष आहे. इतकेच नव्हे तर त्या चार भाजपाच्या नगरसेवकांपैकी एक नगरसेविका अपात्र झालेली असून उर्वरित तीन भाजपाचे नगरसेवक हे अतिक्रमण केल्यामुळे अपात्र होणार आहेत. त्याची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक जून रोजी होणार आहे. इतकेच नव्हे तर हे नगरसेवक नगरअध्यक्षांकडे वारंवार पैशांची मागणी करायचे. अपात्र होण्याच्या भीतीने व त्यांना अपात्रतेच्या कारवाईपासून वाचविण्याची खात्री संबंधितांनी दिल्यामुळेच त्या नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीवर कोणत्या प्रकारचा परिणाम होणार नसल्याचेही माजी मंत्री खडसे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com