शिंदखेडा तालुक्यातील आठ व नंदुरबार जिल्ह्यातील 14 उपसा योजना पुन्हा कार्यान्वित करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप बेडसे यांची मागणी
शिंदखेडा तालुक्यातील आठ व नंदुरबार जिल्ह्यातील 14 उपसा योजना पुन्हा कार्यान्वित करा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

अनेक वर्षांपासून प्रलंबित धुळे जिल्हा पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत येणार्‍या शिंदखेडा तालुक्यातील आठ व नंदुरबार जिल्ह्यातील 14 सहकारी उपसा योजना पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप बेडसे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना. जयंतराव पाटील यांची भेट घेतली.

शिंदखेडा तालुक्यातील 26 गावांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सहकारी उपसा सिंचन योजना मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या उपसासिंचन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत हजारो लाभार्थी शेतकर्‍यांची इच्छा पूर्ण झाल्यास शिंदखेडा तालुक्यातील 26 गावातल्या हजारो हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येऊन शेतकर्‍यांना दुष्काळाचा करावा लागणारा सामना संपुष्टात येईल. म्हणून श्री. बेडसे यांनी ना. पाटील यांची भेट घेतली.

शिंदखेडा मतदारसंघातील 8 व नंदुरबार जिल्ह्यातील14 सहकारी उपसा सिंचन योजना चालू करण्याचे साकडे घातले आहे.

यामुळे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील 90.50 दलघमी पाण्यामुळे शिंदखेडा मतदार संघातील आठ उपसा सिंचन योजनेअंतर्गत 26 गावातील 3157 लाभार्थी शेतकर्‍यांचे 5223 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील 14 उपसा सिंचन योजनेअंतर्गत 33 गावातील हजारो लाभार्थी शेतकर्‍यांचे 9190 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.. यामुळे शेतकर्‍यांना बारामाही पिके घेण्यास व दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी बळ मिळेल.

जलसंपदा आणि पाटबांधारे विभागातील संबंधित अधिकार्‍यांची पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना ना. पाटील यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com