मविआला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव; रवी राणांचा आरोप

मविआला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव; रवी राणांचा आरोप

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदान (Voting) करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. दबाव टाकण्यासाठी वॉरंट काढले जात असल्याचा गंभीर आरोप आ. रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे...

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Council Election) आज मतदान होत आहे. या निमित्ताने भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे.

या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. अशातच आ. रवी राणा यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.

ते पुढे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले रवी राणा आमच्या पायापाशी येईन. एक लक्षात ठेवा ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्यांना तुम्ही धोका दिला आहे. तुम्हाला जनता पायाशी घेईन. लोकांना तुम्ही खोटी आश्वासने दिली, लोकांची दिशाभूल केली, अशी टीका त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com