संजय राऊत चवन्नी छाप माणूस; काय म्हणाले रवी राणा?

संजय राऊत चवन्नी छाप माणूस; काय म्हणाले रवी राणा?

मुंबई | Mumbai

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे....

संजय राऊत (Sanjay Raut) हा चवन्नी छाप माणूस आहे, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. तसेच आमच्या घराच्या बांधकामात उल्लंघन झाले नाही. मुंबई महापालिका आमच्यावर सुडाने कारवाई करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची तब्ब्येत आता ठीक आहे. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली आहे. आमच्यावर दबाव टाकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कारवाई करत आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, कोणाला भेटत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत की नाही हेच कळत नाही, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.