नारायण राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप; म्हणाले....

नारायण राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप; म्हणाले....

मुंबई | Mumbai

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केलंय, यामध्ये काही अपक्ष आमदारही आहेत.

याच दरम्यान नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेची ही अवस्था पाहून संजय राऊत खूश असतील असं राणे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने. असे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com