राजमाता जिजाऊ जयंतीदिनी नाशकात राष्ट्रवादीच्या 'परिवार संवाद'ला सुरुवात

राजमाता जिजाऊ जयंतीदिनी नाशकात राष्ट्रवादीच्या 'परिवार संवाद'ला सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राजमाता जिजाऊ जयंतीच्या (Rajmata Jijau birth anniversary) निमित्ताने अभिवादन करत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी परिवार संवाद (Rashtravadi parivar samvad) अभियानाच शुभारंभ करण्यात आला....

या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP president sharad pawar) व पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कर्डक (nashik ncp leader balasaheb kardak) यांनी केले.

पंचवटी येथे विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ (divisional president shankar mokal) यांच्या संपर्क कार्यालयात आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक महानगरपालिका पालिका निवडणुकीच्या (Upcoming Nashik municipal corporation result) पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे.

आगामी महानगरपालिका निवडणूक मंत्री छगन भुजबळ (NCP leader Chhagan bhujbal) व माजी खासदार समीर भुजबळ (ex mp sameer bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंचवटी विभागात 'राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानास सुरुवात करण्यात येत आहे.

राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी ती संकल्पना पूर्ण केली. ही संकल्पना घेऊन महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा संकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केला असल्याचे बाळासाहेब कर्डक यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, समाजसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब व पक्षाचे विचार, धेय्य धोरणे याबाबत संवाद घडवून आणण्यात येईल. तसेच नाशिक महानगरातील समस्या जाणून घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगत राष्ट्रवादी संवाद अभियान राबवीत असतांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करून नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलिप खैरे, विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ, महापलिकेच्या माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, रवि हिरवे, सचिन कळासरे, संतोष जगताप, प्रफुल्ल पाटील, भालचंद्र भुजबळ, दर्शन मंडलिक, गणेश पेलमहाले, आकाश कोकाटे, विलास वाघ, आर्यन मोकळ, साहिल मोकळ, भुषण सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com