रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर दाखल, शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत

रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर दाखल, शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभीनाक्यावर दाखल झाल्या आहेत.

ठाण्यात रश्मी ठाकरे यांचे ठाकरे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. ठाण्यात दाखल होताच रश्मी ठाकरे यांनी आनंद आश्रम येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतले.

रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर दाखल, शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत
नाशकात पुन्हा जोर'धार', पाहा फोटो...

त्यांनतर आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील देवीचेही दर्शन घेतले. आनंद दिघे (Anand Dighe) यांनी टेंभी नाका जय अंबे देवीची स्थापना केली होती.

रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर दाखल, शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत
Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com