राणे बंधूंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांची बेडकाशी तर त्यांच्या दोन्ही पुत्रांची बेडकाच्या पिलांशी तुलना केली होती
राणे बंधूंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार

मुंबई | Mumbai

काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख अशा दुहेरी भूमिकेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांची बेडकाशी तर त्यांच्या दोन्ही पुत्रांची बेडकाच्या पिलांशी तुलना केली होती. याला राणे बंधूंनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो - निलेश राणे

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. “नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य, पण बिहारवर २० मिनिटं. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो,” अशी टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

..मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते! - नितेश राणे

नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यामातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, ‘टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन द्या,” अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली. दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट.. मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया..मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते! अशा अशायाचे ट्विट त्यांनी केले आहे.

काय म्हंटले होते उद्धव ठाकरे ?

गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरेंनी केली होती. काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं आव्हानच त्यांनी नाव न घेता राणेंना दिलं होतं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com