रमेश बैस यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

भगतसिंह कोश्यारी (Bhgatsingh Koshyari) यांचा राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी (Governor) नियुक्ती करण्यात आली. त्याबाबत राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात नियुक्ती आदेश जारी केला होता…

कोश्यारी यांनी तीन वर्षापेक्षा जास्त काळ राज्याचे राज्यपालपद सांभाळले. मात्र, राज्यातील राजकीय संघर्ष, त्यात त्यांनी घेतलेली भूमिका, वादग्रस्त वक्तव्ये यामुळे त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली. आज राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी समारंभ आज पार पडला.

न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राजभवनात शपथविधी पार पडला. राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येणाऱ्या काळात नव्या राज्यपालांची भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ‘मातोश्री’वर बोलावली तातडीची बैठक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला. मध्यप्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते. बैस याआधी झारखंडचे राज्यपाल होते. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेलं… शिवसेना भवनाचं काय?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *