Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्या“उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे...”; रामदास कदमांचा घणाघात

“उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे…”; रामदास कदमांचा घणाघात

मुंबई | Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (५ मार्च २०२३) रत्नागिरीच्या खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी करत भाजपा-शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या सभेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

- Advertisement -

आज रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही बेभान झाला. शिवसेना माझी प्रायव्हेट लि. कंपनी आहे असं वागले. मी म्हणेल तेच होईल. हुकुमशहा प्रवृत्तीसारखे उद्धव ठाकरे वागले. मला बदनाम करण्याचं राजकारण तुम्ही केले. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेते बाहेर. आम्हालाही बोलता येते. उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले आहेत, माझ्या नादाला लागू नका’ अशी संतप्त प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे.

विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार! मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर केली लघुशंका

‘माध्यमांसमोर जाण्यास मला बंदी घालण्यात आली होती. अयोध्येमध्ये जाण्यासाठी उद्धव ठाकरे निघाले होते तेव्हा सगळी व्यवस्था रामदास कदम यांनी केली होती. संजय राऊत यासाठी साक्षीदार आहेत. पण आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मला बोलवून घेतले आणि माझ्यासोबत अयोध्येला यायचं नाही असं सांगितले. मला काही कळले नाही. बाळासाहेब गेल्यानंतर माझ्या सभा बंद करुन टाकल्या. उद्धवजी तुमचा चेहरा भोळा दिसतो. पण त्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत याचा मी साक्षीदार आहे. तुमची नस मी ओळखतो,’ असे रामदास कदम म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी मटण खाऊन घेतलं देवदर्शन; शिवसेनेच्या नेत्याकडून टीकास्त्र

यासोबत ते पुढे म्हणाले की, ‘मला संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. ठाकरेंच्या सभेला मुंबई, ठाण्यातून लोक आणली. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला बाहेरून माणसं आली होती. त्यांच्या कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन. माझ्या नादाला लागू नका, शिवसेना आमची आहे. बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. भ्रष्टाचारी हातात धनुष्यबाण देऊ शकत नाही. धनुष्यबाण सगळ्यांचाच हातात येत नाही. वडिलांच्या विचारांची बेईमानी तुम्ही केली.’

देशात नवा व्हायरस? सर्दी-खोकला लवकर बरा होईना…; ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

तसेच केशवराव भोसलेचा ड्रायव्हर या वक्तव्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. ‘मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल. मी वाघासारखा जगलोय, कोणाचा ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. केशवराव भोसले यांच्या निवडणुकीच्या वेळी माझी गाडी, माझा पैसा, माझं डिझेल, काय संबंध कोणाचा ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा? काल तुम्ही भाषणाची सुरुवातच अशी केली.’

- Advertisment -

ताज्या बातम्या