रामदास आठवले म्हणतात, उद्धव ठाकरे पंतप्रधान होणे अशक्य
राजकीय

रामदास आठवले म्हणतात, उद्धव ठाकरे पंतप्रधान होणे अशक्य

राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai - उद्धव ठाकरेUddhav Thackeray यांची ताकद पंतप्रधान होण्याएवढी अजिबात नाही. ते पंतप्रधान होणे अशक्य आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेRamdas Athawale यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनावाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्यावर टीकाही केली आहे. सोमवारी सामना या वर्तमानपत्रात सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा, या शीर्षकाखाली अग्रलेख छापण्यात आलेला आहे. या लेखाचा समाचार घेत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होऊ शकत नसल्याचे म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांची ताकद पंतप्रधान होण्याएवढी अजिबात नाही. ते पंतप्रधान होणे अशक्य आहे, असं आठवले म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा, पण ते आज आमच्यात असते तर आनंद झाला असता. आज ते आमच्यासोबत नाहीत, याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र संपूर्ण देशात करोनाविषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते हितचिंतक आणि कुटुंबातील नातेवाईकांना वाढदिवसा निमित्ताने भेटण्यासाठी मातोश्रीवर येऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. असं असताना राज्यातील तसेच देशातील मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना फोनवरुन शुभेच्छाही दिल्या आहेत. या शुभेच्छा देत असताना विरोधकांनी मात्र टीका करण्याची संधी वाढदिवसालाही सोडली नाही.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेच आहेत. पंतप्रधान होणे सोपे नाही. त्यासाठी संपूर्ण देशामध्ये पक्ष असला पाहिजे. 18 लोकांवर पंतप्रधान होणे अशक्य आहे, असं आठवले म्हणाले.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामनामध्ये प्रकाशित झालेल्या अग्रलेखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भातील वक्तव्य असल्यामुळे रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेलं हे खोचक वक्तव्य आज राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनलं आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com