“निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले, तेंव्हा...”; रामदास आठवलेंची भन्नाट कविता

“निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले, तेंव्हा...”; रामदास आठवलेंची भन्नाट कविता

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री आपला निर्णय जाहीर करत शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही.

यावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भन्नाट कविता करत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले तेव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले! निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले कारण उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मागे लागून एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले!" असं आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शायराना अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. “हम बेवफा हरगीज न थे, पर हम वफा कर ना सके!”, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्यात. याआधीही अशी बंडखोरीची घटना घडली आहे. कटकरस्थान उद्धव ठाकरेसाठी केलं. पण मला शिंदे गटाची काळजी वाटते. त्यासाठी हा शेर आठवला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com