राज्यसभा निवडणूक : संभाजीराजेंनी सस्पेन्स वाढवला; म्हणाले, “मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा...”

राज्यसभा निवडणूक : संभाजीराजेंनी सस्पेन्स वाढवला; म्हणाले, “मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा...”

मुंबई । Mumbai

संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje) यांच्या राज्यसभेवरच्या (rajyasabha election) जागेविषयीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेने (Shivsena) संभाजीराजेंचा पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजेंची मात्र ही ऑफर धुडकावून लावली आहे.

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्माम राखतील अशी अपेक्षा असल्याचे वक्तव्य संभाजी राजे यांनी म्हटले. संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांनी अजूनही शिवसेनेकडून अपेक्षा सोडली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ते लवकरच मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची शक्यताही माध्यमांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यसभेची सहावी जागा कोणाला मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com