कोमलच्या जाण्याने उदयनराजे झाले भावूक!

उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर पोस्ट करत केले दुःख व्यक्त
कोमलच्या जाण्याने उदयनराजे झाले भावूक!

मुंबई | Mumbai

साताऱ्यातील कोमल पवार गोडसे हिच्या जाण्याने राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले भावूक झाले आहे. त्यांनी फेसबुक वर भावनिक पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हंटले आहे,

"सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार - गोडसे हीला २०१७ साली "प्लमोनरी हायपरटेन्शन" या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ति मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आणि कोमल ठरली होती महाराष्ट्रातील पहिली "दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण" झालेली व्यक्ती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला. कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी "कोमल न्यू लाईफ फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्या कोमल ला "सातारा" नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमल ला भावपूर्ण श्रद्धांजली."

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com