राज्यसभा निवडणुक : MIM चं मत कोणाला? ओवैसी स्पष्टच बोलले

राज्यसभा निवडणुक : MIM चं मत कोणाला? ओवैसी स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांवरुन (Rajya Sabha Election) घमासान सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे.

एरवी ज्यांची कधी चर्चा होत नाही, असे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना राज्यसभा निवडणुकीमुळे अचानक महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते आता या आमदारांना गळ घालताना दिसत आहेत. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) याबाबत भाष्य केले आहे.

ओवैसी म्हणाले की, महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. राज्यसभेसाठी आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. राज्यसभेला कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी आम्हाला जगजाहीर पाठिंबा मागावा. आम्ही पाठिंबा देऊ,नाही तर काही गरज नाही. आम्ही आमच्या आमदारांशी बोलत आहोत,असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com