राजू शेट्टींनी घेतली राज्यपालांची भेट; काय झाली चर्चा?

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मुंबई (Mumbai) येथे राजभवनात आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीच्या कोट्यातून १२ आमदारांच्या यादीत नाव असेल तर ते वगळण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे…

साधारण अर्धा तास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली. राजू शेट्टी यांच्या कामाबद्दल राज्यपालांनी त्यांचे कौतुक केले. तसेच महाविकास आघाडीच्या कोट्यातून १२ आमदारांच्या यादीत राजू शेट्टी यांचे नाव असेल तर ते वगळण्याची विनंती लेखी पत्राद्वारे राज्यपालांकडे करण्यात आली.

तसेच राजू शेट्टी यांनी माझा भुईभोग हा कवितासंग्रह राज्यपालांना भेट दिला, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

दरम्यान, राजू शेट्टींनी आता एकाला चलोचा नारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना नुकतीच महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असेल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *