Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयकोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही

कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही

पुणे |प्रतिनिधी| Pune

कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून मला त्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीं यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

आम्ही विधानसभेत ‘एफआरपी’साठी आवाज उठवला. मात्र, त्याचे श्रेय राजू शेट्टी घेत आहेत.अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर केली होती.त्याबाबत शेट्टी यांना विचारले असता, ते म्हणाले की, कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यामध्ये किमान हमी भाव या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.

नाहीतर आंदोलनाचा भडका उडेल

राजू शेट्टी म्हणाले, देशातील बहुतांश खातेदार शेतकरी यांची उपजीविका शेतीवर आहे. आम्ही किमान हमी भाव कायदा मंजूर करावा याबाबतचा मसुदा तयार केला आहे. त्यामध्ये हमीभाव ठरल्यानंतर त्याच्या आत माल विकत घेणार नाही. तसेच, एमएसपी’ला हमीभाव मिळण्यासाठी ग्रामसभेचा ठराव करून त्याचे कागदपत्रे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे नेणार असल्याचेही शेट्टी  यांनी सांगितले.

त्याबाबत शासन निर्णय होणे आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा आंदोलनाचा भडका उडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने काही अवधी मागितला आहे. वजन-काटे येत्या काही महिन्यात डिजिटल होतील अशी आशा आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, सीमावादावर ते म्हणाले, ८६५ गावं आपले आहेत. हे सुप्रीम कोर्टात सांगायचे मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ही सरकारची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.या गावांकडे दुर्लक्ष का झाले याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या