जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हे धोरण कायम असणार - राजू शेट्टी

जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हे धोरण कायम असणार - राजू शेट्टी

पुणे (प्रतिनिधि)

जरंडेश्वर साखर करखान्यासोबतच राज्यातील एकूण ४३ कारखान्यात घोळ आहे. मग फक्त जरंडेश्वरच का? गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर केली आहे.

मी सहा वर्षांपूर्वी हेच सांगत होतो. लिस्ट फार मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत,असेही शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडीवर नाराज अन् भाजपा सरकारवर खुश, अस काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार,जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हे धोरण कायम असणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.

१९ ऑक्टोबरला जयसिंगपूरला ऊस परिषद झाली. त्यात काही ठराव झाले त्याची प्रत आयुक्तांना राजू शेट्टी यांनी दिली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. साखर कारखान्यांना एक रकमी एफआरपी देण्यात यावी. डिसेंबरमध्ये तीन हजार तीनशे एवढी द्यावी व राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी. ती तुकड्या तुकड्यात दिला जाते. १३ महिने पैसे राहतात त्याच्या व्याजाच काय झाल? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारने साखरेचे भाव ३७ रुपये करावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

“राज्यात ९ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. गोपीनाथ मुंडे महामंडळला केंद्र सरकारने मदत करावी, ऊसतोडणी मजूर नावनोंदणी करावी, जे कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत ते कारखाने चालू देणार नाही”, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला.

सदाभाऊ खोत यांना टोला

हर्बल तंबाखू पिकवण्यास परवानगी द्यावी असे पत्र भाजपचे आमदार व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठवले होते. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा.यावेळी शेट्टी यांनी खोतांबाबत अधिक भाष्य करायचे टाळत, मी त्या माणसावर जास्त बोलणार नाही, अशी टिपण्णी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com