धरणगाव नपा स्विकृत नगरसेवकपदी राजेंद्र महाजन

निवडीचे होतेय सर्वत्र स्वागत
धरणगाव नपा स्विकृत नगरसेवकपदी राजेंद्र महाजन

धरणगाव (प्रतिनिधी) Dharangaon

माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे पालिकेच्या रिक्त झालेल्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे‌.

तत्कालिन लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.सलिमभाई पटेल यांच्या अकस्मित निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुरेशनाना यांचे पुत्र निलेश चौधरी हे निवडून आले. एकाच परिवारातील दोन सदस्य नको, संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळावी या उद्देशाने स्वतः मोठे मन दाखवून सुरेशनाना यांनी आपल्या स्विकृत सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

सुरेशनाना चौधरी यांच्या या निर्णयामुळे रिक्त झालेल्या जागेवर पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका यांनी एकमताने शिवसेना शहरप्रमुख व उद्योजक राजेंद्र किसन महाजन यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता.

हा प्रस्ताव मंजूर करून पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांचे नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दिली आहे. या निवडीचे पालकमंत्री गुलाबरावपाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना परीवार धरणगाव तालुका यांनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com