काँग्रेसनं विधान परिषदेच्या उमेदवारचं नावं केलं जाहीर

काँग्रेसनं विधान परिषदेच्या उमेदवारचं नावं केलं जाहीर

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे (Congress) दिवंगत नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांना विधान परिषदेची (Legislative council of Maharashtra) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आज याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे (Sharad Ranpise) यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. या जागेसाठी जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा होती.

काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर (RajyaSabha) वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काँग्रेसने दिलेला शब्द पाळत प्रज्ञा सातव यांना उमदेवारी जाहीर केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com