Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयराजस्थान सत्तासंघर्षाचे पडसाद महाराष्ट्रात

राजस्थान सत्तासंघर्षाचे पडसाद महाराष्ट्रात

मुंबई |Mumbai –

राजस्थानमधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. Rajasthan political crisis मुख्यमंत्री अशोक गेहलोत Ashok Gehalot आणि बंडखोर नेते सचिन पायलट Sachin Pilot यांच्यातील सत्तासंघर्षात रोज राजकीय समीकरणं बदलत आहेत. काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपविरोधात राजस्थानात जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलने सुरू झाली आहेत. आता या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात येऊन पोहोचले आहे. आज राजस्थानातील काँग्रेस सरकारच्या पाठीशी उभे राहात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने मुंबईच्या राजभवनाबाहेर भर पावसात जोरदार निदर्शने केली. Maharashtra congress demonstrations यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व महाराष्ट्राच्या राज्यपालांना निवेदनही देण्यात आले. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्याचे अनेक मंत्री, काँग्रेसचे अनेक नेते, आमदार व कार्यकर्ते हजर होते.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज भर पावसात भिजत भिजत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण शालेय, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड असे अनेक मंत्री, नेते आमदार आणि कार्यकर्ते या सहभागी झाले होते. यावेळी राज भवनाबाहेर लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, नही चलेगी नही चलेगी, भाजपा की दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा देण्यात आल्या.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले, राजभवन हे राजकारणाचे अड्डे बनले आहेत. आम्ही राजस्थान विधानसभेचे अधिवेशन घ्या, अशी मागणी करत आहोत. मात्र राजस्थानचे भाजपाचे राज्यपाल राजकारण खेळत आहेत. हा फक्त राजस्थान सरकारचा विषय नाही. तर देशाचा विषय आहे. देशाची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील बिगर भाजपा सरकारे पाडण्याची जी मोहीम भाजपाने चालविली आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे.

मुंबईचा राज भवनाबाहेर काँग्रेस पक्षाची ही निदर्शने सुरु होती. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नागपूरला गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आपल्या निवेदनाची प्रत राज्यपालांच्या अधिकार्‍यांकडे सोपविली. याच निवेदनाची दुसरी प्रत नागपूर येथेही राज्यपालांना सोपविली जाणार आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या